WhatsApp मध्‍ये मोठा बदल!  आता व्हॉट्सॲपवर ‘स्टेटस ॲड्स’ नवीन फीचर सुरू ; जाणून घ्या
WhatsApp मध्‍ये मोठा बदल! आता व्हॉट्सॲपवर ‘स्टेटस ॲड्स’ नवीन फीचर सुरू ; जाणून घ्या
img
Dipali Ghadwaje
 व्हॉट्सॲप  आता फक्त चॅटिंग ॲप राहिलेले नाही. आता त्यात जाहिरातीही दिसू लागल्या आहेत. मेटाने व्हॉट्सॲपवर ‘स्टेटस ॲड्स’ नावाचे एक नवीन फीचर सुरू केले  आहे. याचा अर्थ असा की, ज्याप्रमाणे इंस्टाग्राम किंवा फेसबुक स्टोरीजवर जाहिराती दिसतात. त्याचप्रमाणे आता तुम्हाला व्हॉट्सॲपच्या स्टेटस सेक्शनमध्येही जाहिराती दिसतील.

आता व्हॉट्सॲपवरील वापरकर्त्यांना स्टेटस सेक्शनमध्ये स्क्रोल करताना अधूनमधून जाहिराती दिसतील. हे तेच स्टेटस आहेत जे तुमचे संपर्कातील लोक (कॉन्टेक्ट्स) पोस्ट करतात. तुम्ही ते 24 तासांच्या आत पाहू शकता.

आता जेव्हा तुम्ही एकामागून एक स्टेटस पाहता तेव्हा तुम्हाला त्यांच्यामध्ये मेटाने प्रकाशित केलेल्या जाहिराती दिसू शकतात. जर तुम्ही तुमच्या मित्रांचे किंवा कुटुंबातील सदस्यांचे व्हॉट्सॲप स्टेटस पाहत असाल, तर काही स्टेटसनंतर तुम्हाला स्पॉन्सर्ड स्टेटस जाहिराती दिसतील.

हे स्पॉन्सर्ड स्टेटस प्रत्यक्षात एक जाहिरात असेल, जी मेटाद्वारे दाखवली जाईल. तुम्ही इतर स्टेटसप्रमाणे स्वाइप करून या जाहिराती वगळू शकता.

नवीन मोबाईल फोन किंवा गॅझेट्सच्या जाहिराती, ई-कॉमर्स कंपन्यांच्या डिस्काउंट ऑफर्स, चित्रपट किंवा वेब सिरीजचे ट्रेलर, सौंदर्य, फॅशन आणि फूड ब्रँडचे प्रमोशन देखील पाहता येतील.

सध्या या जाहिराती वेरिफाइड चॅनेलवर दिसू लागल्या आहेत. तुमचे चॅट्स यानंतरही पूर्णपणे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असणार आहेत. याचा अर्थ असा की, कोणीही तुमचे चॅट्स वाचू शकत नाही, मग ते मेटा असो, सरकार असो किंवा हॅकर असो. व्हॉट्सॲप तुम्हाला फक्त तुमच्या स्टेटस व्ह्यूइंग पॅटर्न, ॲप वापर आणि सामान्य डेटावर आधारित जाहिराती दाखवेल.

सध्या व्हॉट्सॲप स्टेटस जाहिराती बंद करण्याचा कोणताही थेट पर्याय नाही. हे मेटाद्वारे हळूहळू सर्व वापरकर्त्यांसाठी आणले जात आहे. येत्या काळात ते पूर्णपणे इंटीग्रेटेड केले जाईल.

व्हॉट्सॲपवर स्टेटस जाहिराती सुरू झाल्यामुळे मेटा आता या प्लॅटफॉर्मला उत्पन्नाचे साधन बनवू इच्छित आहे, हे दिसून येते. तुमच्या चॅटिंग किंवा गोपनीयतेला कोणताही धोका नसला तरी, ॲपवरील वापरकर्त्याचा अनुभव निश्चितच थोडा बदलेल.

इतर बातम्या
Join Whatsapp Group