दिशा सालियान प्रकरणात मोठी अपडेट ; दिशाच्या लॅपटॉपमध्ये मिळाला वडिलांचा व्हाट्सएप डेटा,
दिशा सालियान प्रकरणात मोठी अपडेट ; दिशाच्या लॅपटॉपमध्ये मिळाला वडिलांचा व्हाट्सएप डेटा, "ही" माहिती आली समोर
img
Dipali Ghadwaje
दिशा सालियान आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. दिशाच्या लॅपटॉपमध्ये वडील सतीश सालियानं यांचा व्हाट्सएप डेटा मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , आधीच्या एसआयटीला चौकशीदरम्यान हा डेटा मिळाला होता. दिशाचे वडील सतीश सालियान यांचे एखाद्या महिलेशी संबंध असल्याचा दिशाला संशय होता.

आपलं व्हाट्सएप दिशाही बघतेय याची वडिलांना माहिती नव्हती. त्या महिलेला 3 हजार रुपये दिल्याचा दिशानं जाब विचारला होता. 2 जून 2020 ला जाब विचारला होता, 4 जूनला दिशाने घर सोडले होते. वडिलांचं घर सोडून मालाड मालवणीस गेल्याचं दिशानं मित्रांना सांगितलं होतं. दिशाच्या मित्रांनी पोलीस चौकशीतही दुजोरा दिला आहे. 

आधीच्या एसआयटीच्या तपासामध्ये असं समोर आलं होतं की, दिशाच्या मित्रांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं त्यावेळी त्यामध्ये उल्लेख होता की, दिशाने मित्रांना सांगितलं होतं की, दिशाच्या वडिलांनी एका महिलेला पैसे पाठवले होते.

मात्र, सतीश सालियान यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला तेव्हा त्यावेळी पोलिसांना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं ती महिला त्यांच्या मित्राची पत्नी आहे आणि तिला पैशाची गरज होती, म्हणून पैसे दिले होते. यामागे चुकीचा विचार नव्हता, यामागे कोणत्याही चुकीच्या प्रकारचा हेतू नव्हता. पण दिशाच्या लॅपटॉपमध्ये वडील सतीश सालियानं यांचा व्हाट्सएप डेटा मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

पुरावे आणि डेटा हा चौकशीचा भाग आहे. मात्र, यामुळे दिशा देखील डिस्टर्ब असल्याचा दावा पूर्वीच्या एसआयटीने केला होता. मात्र, आत्ता एसआयटीद्वारे पुन्हा एकदा तपास व्हावा, त्याचबरोबर दिशाच्या वडिलांनी अनेक गंभीर आरोप केलेले आहेत.

दिशा सालियान मृत्यू प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. दिशाचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून आमदार आदित्य ठाकरे आणि दिनो मौर्या यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.

सतीश सालियान यांनी याचिकेतून या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा. सालियान कुटुंबावर दबाव टाकून दिशाभूल केल्या प्रकरणी किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल करावा.

पारदर्शक तपास होण्यासाठी राज्याबाहेर तपास होऊ द्यावा. दिशाचं शवविच्छेदन करतानाचं चित्रीकरण आणि कागदपत्र समोर आणावे. आदित्य ठाकरेंसह त्यांचा बॉडीगार्ड, सुरज पांचोली, दिनू मौर्या आणि मुंबई पोलिसांचे मोबाईल टॉवर लोकेशन काढण्यात यावे.

दिशाचा फोन आणि लॅपटॉप दिशाचा प्रियकर रोहन रॉयकडे देण्यात आले आहेत. ते दिशाच्या कुटुंबाकडे देण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आलेल्या आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group