डेक्कन परिसरातील सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणानंतर पती आणि पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. तसेच रुग्णालयावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. रुग्णालयावर काय कारवाई होणार याकडे सर्वाचेच लक्ष लागले होते. याप्रकरणी आता आरोग्य विभागाने मोठे पाऊल उचलले आहे.
हे ही वाचा
यकृत प्रत्यारोपणानंतर बापू कोमकर यांचा १५ ऑगस्टला मृत्यू झाला होता, तर दाता असलेल्या पत्नी कामिनी यांचा २२ ऑगस्टला मृत्यू झाला होता. रुग्णांच्या नातेवाइकांनी या प्रकरणी सह्याद्री रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप केला. या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सल्लागार समितीची मंगळवारी बैठक झाली.
हे ही वाचा
या प्रकरणी चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही समिती चार आठवड्यांत चौकशी करून अहवाल सादर करणार आहे. याचबरोबर या समितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांना तातडीने स्थगिती देण्यात आली आहे.