नाशिक शहराप्रमाणे ग्रामिण भागात जिल्हा पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांच्या निर्देशाने ऑलऑट मिशन सुरू झाले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी रविवारी पहिल्याच दिवशी टावळखोरांना दणका दिला असून चौकाचौकात उभे राहून टवाळक्या करणारे, भाविकांची वाहने अडवणारे यासह नाहक रस्त्यावर भटकणारे २० पेक्षा जास्त युवकांना पोलीसी खाक्या दाखवत पोलीस ठाण्यापर्यंत वरात काढली.

त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा ११२,११७ नुसार प्रतिबंधात्म कारवाई केली. यापुढे दररोज शहरात अशा प्रकारे गुंडगिरी करणा-यांवर लक्ष ठेवून त्यांना कायद्याचा धाक काय असतो याची प्रचिती देणार आहेत .
दरम्यान त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसरात भूमाफायींच्या कारनाम्यांनी दहशत निर्माण झाली होती. असे सर्व भूमाफीया व त्यांच्या सोबत असलेले कब्जे घेण्यास मदत करणारे गुंड प्रवृत्तीचे लोक यांच्यावर नजर ठेवण्यात आलेली आहे.नागरिकांनी अशा प्रकारे कोणाला त्रास देत असतील तर त्यांनी पोलीसांशी संपर्क करावा, तकारदाराचे नाव गुप्त ठेवले जाईल अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.
नागरिकांनी जमीन हडप केलेली असेल तर माहिती देण्याचे आवाहन केले आहे.अवैध सावकारी विरूध्द मोहिम उघडण्यात आली आहे. धाक दडपशा दाखवून वसुली करणारे असतील त्यांना कायद्याच्या आधारे शासन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.शहरातील अवैध बॅनरवर कारवाई करण्यात आली आहे. बहुतांश बॅनर रात्रीतून गायब झाले आहेत.शहरात बेदरकार वाहन चालवाणारे, डिजे वाजवून शांतताभंग करणारे असे सर्व रडावर आले आहेत.
पोलीस ठाणे हद्दीतील काळे फिल्म लावलेल्या वाहनांवर त्रंबकेश्वर पोलीस ठाणे मार्फत कारवाई करून वाहनांच्या फिल्म काढून दंडात्मक कारवाई करण्यात आलेले आहे. सदर कारवाई दरम्यान पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी,पोलीस उपनिरीक्षक गीते, पोलीस हवालदार सचिन जाधव, पोलीस शिपाई बोराडे उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्व वाहनधारक यांना त्यांचे गाडीत लावण्यात आलेल्या काळी रंगाची फिल्म काढून टाकण्याबाबत आवाहन करण्यात आलेले आहे.
जमीन हडपणे, गुंडगिरी करणे, धाक दाखवणे इत्यादी कोणत्याही प्रकारचा त्रास नागरिकांना होत असेल तर त्यांनी त्र्यंबक पोलीस ठाण्यात संपर्क करावा. तातडीने कारवाई केली जाई ल.
महेश कुलकर्णी, निरीक्षक, त्र्यंबक पोलीस ठाणे