मुंबई नाका परिसरातून 15 जुगारी ताब्यात
मुंबई नाका परिसरातून 15 जुगारी ताब्यात
img
दैनिक भ्रमर

नाशिक (प्रतिनिधी) :- मुंबई नाका परिसरात जुगार खेळताना 15 जणांना मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की मुंबई नाका परिसरातील सहवासनगर येथील एका गिरणीजवळ 15 जण तीनपत्ती नावाचा जुगार खेळत होते. पोलिसांना याबाबत माहिती मिळाली असता त्यांनी वरील ठिकाणी धाड टाकली. त्यावेळी गगन शंकर विधाते (वय 27), संदीप धनाजी विधाते (वय 42), सुदर्शन दत्तू सोनार (वय 42), तौसीहफ इब्राहिम शेख (वय 56), भास्कर अशोक वाडगावकर (वय 41), प्रफुल्ल प्रकाश पहाडी (वय 38), अल्लाउद्दीन रफिक शेख (वय 43), सागर राजेंद्र ताजणे (वय 36), रमेश हिरामण बंजारा (वय 33), रवींद्र सोमनाथ वाघ (वय 42), जयरोद्दीन सफीउद्दीन कुरेशी (वय 41), संदीप ईश्‍वर सूर्यवंशी (वय 35), ऋषिकेश संतोष जोर्वेकर (वय 23), संजीव किशन कृपलानी (वय 51) व किरण बाजीराव साठे (वय 55) हे तीनपत्ती नावाचा जुगार खेळत होते. पोलिसांनी जुगाराचे साहित्य व 62 हजार 300 रुपये रोख जप्त केले आहेत.

या आरोपींपैकी आठ जणांवर यापूर्वी विविध कलमांन्वये गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखा युनिट-1 चे पोलीस नाईक विशाल काठे यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group