नाशिक : शाब्दिक वादावरून युवकाला जिवे मारण्याचा प्रयत्न
नाशिक : शाब्दिक वादावरून युवकाला जिवे मारण्याचा प्रयत्न
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : शाब्दिक वादाच्या कारणावरून कुरापत काढत चौघांनी 19 वर्षीय युवकाला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना रेजिमेंटल प्लाझा येथे घडली.

फिर्यादी तुषार ऊर्फ राज नंदू थारवाणी (वय १९, रा. अरिंगळे मळा, एकलहरा रोड) याचे आरोपी आर्यन शुक्ला याच्या भावासोबत १८ ऑगस्टला शाब्दिक वाद झाले होते. या वादाची कुरापत काढून आरोपी आर्यन शुक्ला, तेजस पगारे, युवराज गुणवंत आणि प्रेम या चौघांनी १८ऑगस्ट रोजी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास रेजिमेंटल प्लाझाजवळ तुषारला एकटे गाठून शिवीगाळ व दमदाटी करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. 

हे ही वाचा... 
नागरिकांना सावधानतेचा इशारा; करंजवण धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु

आर्यनने नंतर काही तरी धारदार शस्त्राने तुषारच्या डोक्यामागे वार करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी युवराज गुणवंत यानेदेखील धारदार शस्त्राने तुषारच्या डाव्या मांडीवर वार करून त्याला जखमी केले. या प्रकरणी तुषार थारवाणीच्या फिर्यादीवरून वरील चारही आरोपींविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी युवराज गुणवंतला अटक केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group