नाशिक (प्रतिनिधी) :
अमली पदार्थ कब्जात बाळगून बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आलेल्या दोन तरुणांकडून सुमारे 20 लाख 37 हजार रुपये किंमतीचा 102 किलो वजनाचा गांजा गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने जप्त केला आहे.
याबाबत माहिती अशी की, काल रात्री साडेसात वाजेच्या सुमारास मखमलाबाद शिवारातील मानकर मळा रस्त्यावर संशयित ज्ञानेश्वर बाळू शेलार (वय32, रा. जयशंकर रो हाऊस, मानकरमळा, मखमलाबाद), निलेश अशोक बोरसे (वय 27, रा. पुष्कर व्हॅली अपार्टमेंट, औदुंबरनगर, पंचवटी) हे दोघे जण होंडाई कंपनीची ॲसेट मॉडेल असलेली एम.एच.04 बीक्यु 0778 या क्रमांकाची कार संशयास्पदरित्या अवस्थेत उभी केली होती.
गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने मिळालेल्या माहितीनुसार, या गाडीची व दोन्ही तरुणांची चौकशी केली असता या गाडीच्या डिक्कीमध्ये हिरवट रंगाची पाने, फुले, बिया असलेला कॅनाबिस गंजा असा एकूण 20 लाख 37 हजार 600 रुपये किंमतीचा 101 किलो 880 ग्रॅम वजनाचा अमलीपदार्थाचा साठा बेकायदेशीररित्या स्वत:च्या कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना आढळून आले.
या दोघांविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, तोडकर, लाड, दिलीप सगळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, पोलीस हवालदार संजय ताजने, देवकिसन गायकर, किशोर रोकडे, गणेश भामरे, डंबाळे, भूषण सोनवणे, दिघे, चकोर, येवले, सानप, नांद्रे, बागरे, निकम, फुलपगारे, राऊत, चव्हाण, कदम आदींनी केली.