२ ऑक्टोबर २०२३
नाशिक (प्रतिनिधी) :- गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने पेठ रोडवर पेठ फाट्याजवळ बीझेड प्लाझा या गाळ्यात चालणार्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून तब्बल 37 जणांवर प्रतिबंधक कारवाई केली असून, 1 लाख 28 हजार 720 रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. एकाच जुगार अड्ड्यावर इतक्या मोठ्या संख्येने जुगारी सापडल्याचे वृत्त येताच सामान्य जनतेमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
याबाबत माहिती अशी, की ऐन गांधी जयंतीच्या दिवशी गुन्हे शाखा युनिट-1 चे पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की पेठ फाटा सिग्नलवरील बीझेड प्लाझामध्ये अनिल जाधव हा पत्त्यांच्या कॅटवर तीनपत्ती नावाचा आणि अंदरबाहर नावाचा जुगार खेळवीत आहे. बोरसे यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना कळविली आणि ढमाळ यांनी तातडीने स. पो. नि. हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यवाजी महाले, हवालदार योगीराज गायकवाड, नाजिम पठाण, देवीदास ठाकरे, पोलीस नाईक विशाल काठे, विशाल देवरे, रमेश कोळी, अंमलदार अमोल कोष्टी, आप्पा पानगळ, राजेश राठोड व समाधान पवार यांचे पथक बीझेड प्लाझाकडे पाठविले.
त्याचबरोबर पंचवटी पोलिसांना माहिती दिल्यानंतर स. पो. नि. रोहित केदार, पोलीस नाईक कैलास शिंदे, संदीप मालसाने व अंमलदार घनश्याम महाले यांचे पथक येऊन दोन्ही पथकांनी बीझेड प्लाझामध्ये धाड टाकली. यावेळी जुगार खेळणारे तब्बल 37 जुगारी आढळले.
त्यामध्ये सुभाष गायकवाड, सुखदेव अंतुले, निरंजन सोमाणी, राजू त्रिभुवन, संजय पारधी, देवीदास अहिरे, कृष्णा वरणकर, लक्ष्मण नलावडे, अरुण पवार, रवींद्र वाघ, राहुल धोत्रे, सागर शिंदे, संजय पवार, किरण चव्हाण, शंकर पवार, हर्षल पवार, आशय गांगुर्डे, अविनाश अहिरे, सुरेश अहिरे, किरण क्षत्रिय, अनिल जाधव, गणेश राऊत, यश गुप्ता, विशाल घोलप, भगवान पाळदे, रोहित जाधव, सलिम शेख, सुमित यादव, दीपक जाधव, संदीप उशिले, सनी शिंदे, रियाज अहमद, कैलास सोनार, जसवंत कश्यप, अशोक मोरे, ज्ञानोबा चव्हाण व लखन माने या 37 जणांचा समावेश आहे.
एवढ्या मोठ्या संख्येने एकाच ठिकाणी जुगारी सापडल्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. या यशस्वी छाप्याबद्दल पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, गुन्हे शाखा उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ आणि दोन्ही पथकांचे अभिनंदन केले आहे. याबाबत पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहेत.
Copyright ©2024 Bhramar