मोबाईल दुकानांवर पोलिसांची धाड ,पाच दुकानांमधून लाखोंचे साहित्य जप्त
मोबाईल दुकानांवर पोलिसांची धाड ,पाच दुकानांमधून लाखोंचे साहित्य जप्त
img
Dipali Ghadwaje
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नामांकित मोबाईल कंपन्यांचे बनावट साहित्य व सुटे भाग बनवून ते विक्री करणाऱ्या पाच दुकानदारांविरोधात भद्रकाली पोलिसांनी छापा टाकून पाच दुकानदारांकडून लाखो रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की नाशिकमधील महात्मा गांधी रोडवर असलेल्या मोबाईल दुकानांमध्ये नामांकित कंपन्यांच्या मोबाईलचे विविध साहित्य व सुटे भाग बनवून कमी किमतीमध्ये विकले जात असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांना मिळाली होती. याबाबत काही मोबाईल कंपन्यांनी गुन्हे शाखा व भद्रकाली पोलिसांकडे तक्रारीही केल्या होत्या

या तक्रारींची दखल घेऊन भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काल मंगळवारी सकाळच्या सुमारास महात्मा गांधी रोडवरील माजीसा मोबाईल, रिद्धी सिद्धी मोबाईल, आशापुरी मोबाईल, बालाजी मोबाईल एजीएम कॉर्पोरेशन, या पाच दुकानांवर धाड घालून त्यांच्याकडून नामांकित कंपन्यांच्या मोबाईलचे 3 लाख 52 हजार रुपये किमतीचे बनावट साहित्य जप्त करण्यात आले. या सर्व दुकानदारांविरुद्ध कॉपीराईट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group