नाशिकरोड पोलिसांनी केला गुटख्याचा कारखाना उद्ध्वस्त
नाशिकरोड पोलिसांनी केला गुटख्याचा कारखाना उद्ध्वस्त
img
Chandrakant Barve


नाशिकरोड (प्रतिनिधी):-नाशिकरोड पोलिसांनी सामनगाव शिवारात सुरू झालेला प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पान मसाला तयार करण्याचा कारखाना उध्वस्त केला. सुमारे लाखो रुपयेचा मुद्देमाला सह तीन  संशयीतांना जेरबंद केले आहे.प्रथमच अश्या स्वरूपाची कारवाई झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी की नाशिकरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके यांना मिळालेल्या माहितीनुसार एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र लगत सामनगाव शिवरात मातृछाया फार्म हाऊस च्या समोर जुन्या खोलीमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाला ची निर्मिती करण्याचा कारखाना आहे.

त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस देविदास वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शेळके पोलीस नाईक पुंडलिक ठेपणे, संतोष पिंगळ, पोपट पवार, अविनाश हांडे, बाळकृष्ण सोनवणे,राजकुमार लोणारी अशांनी गुटखा निर्मितीच्या कारखान्यावर धाड टाकून संशयित आरोपी दिनेश बाबूलाल कुमार वय 35 मूळ जुही बारादेवी कानपूर उत्तर प्रदेश, निलेश दिनेश इंगळे वय 33 त्रिमूर्ती चौक अंबड व दीपक मधुकर चव्हाण वय 45 मोरे मळा उत्तम नगर यांना ताब्यात घेऊन प्रतिबंधित गुटखा निर्मिती कारखान्यामध्ये लागणारे मशीन, सुपारी, भिंतीला चुना, केमिकल असे एकूण दोन लाख 13 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नाशिक शहरात गुटखा विक्री करणाऱ्या वर पोलीस कारवाई करतात मात्र नाशिकरोड पोलिसांनी गुटखा निर्मिती करणाऱ्या कारखान्यात उध्वस्त केल्याने पोलीस अधिकारी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या स्वरूपाची प्रथमच नाशिक रोड परिसरात कारवाई झाली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group