नाशिक : कौटुंबिक कारणातून मुलाने केली वडिलांची हत्या
नाशिक : कौटुंबिक कारणातून मुलाने केली वडिलांची हत्या
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादात मुलाने वडिलांच्या पोटात चाकू मारून खून केल्याचा प्रकार पंचवटीत घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सखाराम पंडित भावसार (वय 65) व आरोपी अश्‍विन सखाराम भावसार (दोघेही रा. रोकडे चाळ, नवनाथनगर, पेठरोड, नाशिक) हे बाप-लेक आहेत. 5 फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सखाराम भावसार व मुलगा अश्‍विन भावसार यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. 

या झटापटीमध्ये अश्‍विन भावसार याने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने वडिलांच्या पोटात डाव्या बाजूला मारून त्यांना जखमी केले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन हल्लेखोर मुलाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group