नाशिक : स्कूल व्हॅनचालकाने केला बालिकांचा विनयभंग
नाशिक : स्कूल व्हॅनचालकाने केला बालिकांचा विनयभंग
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिकमधून एक खळबळजनक घटना समोर अली आहे. शाळेत ने-आण करणार्‍या खासगी स्कूल व्हॅनचालकाने अल्पवयीन मुलींचा विनयभंग केलाय. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खासगी स्कूल व्हॅनचालक सुरेश पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. 



याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी यांच्या मुलीसह इतर अल्पवयीन मुलींना शाळेत ने-आण करण्यासाठी भाडेतत्त्वावर खासगी स्कूल व्हॅन लावण्यात आली आहे. या व्हॅनचा चालक सुरेश नामदेव पाटील (रा. श्रमिकनगर, नाशिक) याने सन 2025 ते दि. 30 मार्च 2026 या कालावधीत अल्पवयीन मुलींना शाळेत व्हॅनमध्ये बसविताना व उतरताना, तसेच व्हॅन शाळेच्या आवारात पार्क केलेली असताना स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे गैरकृत्य करून अल्पवयीन मुलींचा विनयभंग केला. 

या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खासगी स्कूल व्हॅनचालक सुरेश पाटीलविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात अली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नाईक करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group