तरुणाची निर्घृण हत्या, पत्नीसह 7 जण ताब्यात, तरुणाला दगडाने ठेचलं अन...
तरुणाची निर्घृण हत्या, पत्नीसह 7 जण ताब्यात, तरुणाला दगडाने ठेचलं अन...
img
वैष्णवी सांगळे
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे एका ३५ वर्षीय युवकाची  निर्घृण हत्या करण्यात आली होती.  आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर या आरोपींनी मृतदेह तब्बल ९० फूट अंतरापर्यंत ओढत नेला. कृष्णाथ साठे (वय ३५, रा. मंगरूळ) असं मृत युवकाचं नाव आहे.  या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, प्राथमिक तपासाअंती पोलिसांनी मृताच्या पत्नीसह ७ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.



गुरुवारी सकाळी गावालगत असलेल्या ओढ्याजवळ कृष्णाथ साठे प्रात:विधीसाठी गेला होता. यावेळी त्याची अज्ञातांनी निर्घृण हत्या केल्याचा संशय आहे. बराच वेळ झाला तरी कृष्णाथ पुन्हा घरी आला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. यावेळी गावातील काही लोकांना कृष्णाथचा मृतदेह गावालगत असलेल्या एका ओढ्याच्या किनारी झाडाखाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.

पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत हा खुनाचा प्रकार असल्याचं समोर आलं आहे. हल्लेखोरांनी कृष्णाथ यांच्या डोक्यात मोठा दगड घातला आणि तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. इतकेच नव्हे तर, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने किंवा मृतदेह लपवण्यासाठी आरोपींनी मृतदेह तब्बल ९० फूट अंतरापर्यंत ओढत नेला. त्यानंतर ओढ्याच्या काठावर असलेल्या पळसाच्या झाडाखाली मृतदेह फेकून आरोपींनी पळ काढला.

कृष्णाथ यांचा खून नेमक्या कोणत्या कारणातून झाला, याचं गूढ अद्याप पूर्णपणे उकललेले नाही. मात्र, पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा खून अनैतिक संबंधातून झाला असावा असा दाट संशय आहे. याच संशयावरून पोलिसांनी मृताच्या पत्नीला आणि गावातील इतर सहा संशयितांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असून लवकरच या खुनाचे मुख्य कारण समोर येण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group