11 हजारांची लाच घेताना नाशिक जिल्हा परिषदेच्या 2 अधिकाऱ्यांना अटक
11 हजारांची लाच घेताना नाशिक जिल्हा परिषदेच्या 2 अधिकाऱ्यांना अटक
img
दैनिक भ्रमर
नाशिक :- 11 हजारांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
किरण रंगनाथ दराडे (वय 40, कनिष्ठ लेखाधिकारी वित्त विभाग जिल्हा परिषद कार्यालय नाशिक) व सचिन प्रभाकर पाटील (वय 40 वर्ष कनिष्ठ सहाय्यक (लेखा )वित्त विभाग जिल्हा परिषद नाशिक) अशी लाच घेणाऱ्या दोघांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार हे शिक्षक असून त्यांचे व इतर 17 शिक्षकांची वेतन पडताळणी करून त्याची नोंद सेवा पुस्तकात करण्याकरिता तक्रारदार यांनी त्यांच्या सेवा पुस्तकासह एकूण 18 सेवा पुस्तके किरण दराडे यांच्याकडे जमा केली होते. सदर 18 शिक्षकांची वेतन पडताळणी करून सेवा पुस्तके लेखाधिकारी यांच्याकडे सादर करून त्यांच्याकडून  वेतन पडताळणी मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात सुरुवातीला प्रत्येक सेवा पुस्तकाचे 700 रुपये याप्रमाणे 18 सेवा पुस्तकांचे 12600 रुपयांची लाच दराडे यांनी मागितली.

तडजोडीअंती 11000  रुपयांची मागणी करून ही लाचेची रक्कम दराडे यांच्या सांगण्यावरून सचिन पाटील यांनी सदरची रक्कम लाचेची आहे हे माहीत असताना देखील स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशन नाशिक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती मीरा आदमाने, पो. हवा.पंकज पळशीकर, पो.हवा.प्रमोद चव्हाणके, पो.हवा. संदिप वणवे यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group