नाशिकमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 5 हजारांची लाच; गुन्हा दाखल
नाशिकमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 5 हजारांची लाच; गुन्हा दाखल
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- 50 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 5 हजारांची लाच मागितल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हे शाखा युनिट 2 मधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.

राजेंद्र सोपान घुमरे (वय 56, रा. प्लॅट नं. 4, राधा शिल्प अपार्टमेंट, गणेशनगर, द्वारका नाशिक) असे लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे भंगार व्यापार करीत असुन तक्रारदार यांच्या भावाने चोरीचे नळाचे वॉल भंगारात 15 हजार रुपये खरेदी केल्याचे प्रकरणी चोरीच्या गुन्ह्यातून सुटायचे असेल तर घुमरे यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली.

त्यांचे सोबतच्या पोलिसांना कारवाई न करण्यासाठी सांगण्याकरिता व चोरीचा वॉल घेतल्याचे प्रकरण मिटवून टाकण्यासाठी फिर्यादीकडे तडजोडी अंती 5000 रुपये लाचेची  मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शवली. म्हणून त्यांच्या विरुध्द अंबड पोलीस स्टेशन, नाशिक शहर, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7, 7अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, श्रीमती मीरा अदमाने, पोहवा संदीप वणवे, पोहवा योगेश साळवे, पोना अविनाश पवार, चालक पोहवा संतोष गांगुर्डे यांनी केली.
इतर बातम्या
सुहास कांदे यांचा

नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group