Nashik ACB Trap : लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात; कुणकुण लागताच गेले पळून
Nashik ACB Trap : लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात; कुणकुण लागताच गेले पळून
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- 8 हजारांची लाच घेताना मुख्याध्यापकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. जितेंद्र खंडेराव सोनवणे, (वय 45) मुख्याध्यापक, शासकीय आश्रमशाळा ततानी ता. बागलाण जि. नाशिक असे लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे रोजंदारी शिक्षक असून त्यांचा घरघंटी (छोटी पिठाची गिरणी )असून तक्रारदार यांना धान्य दळून देण्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. तक्रारदार यांचे दळणाचे बिल 87480 रुपये सोनावणे यांनी बँक खात्यावर जमा केल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून 8000 रुपये व मार्च 2025, एप्रिल 2025 या महिन्याचे दळणाचे बिल मंजूर करून देण्यासाठी 1300 रुपये अशी एकूण 9300 रुपये लाचेची मागणी केली.

सोनवणे यांनी 8000 रुपये स्वीकारण्याची तयारी  दर्शवली. ही 8000 रुपये लाच रक्कम सोनवणे यांनी त्यांचे कार्यालयात तक्रारदार यांचेकडून स्विकारली व लाचेची रक्कम मोजत असताना काहीतरी संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम टेबलवर ठेऊन तक्रारदार हे कार्यालयाचे बाहेर येऊन इशारा करण्यासाठी येत असताना सोनवणे हे कार्यालयाचे बाहेर दुसऱ्या गेटणे पळून गेले आहेत. या बाबत सोनवणे यांच्या विरुद्ध सटाणा पोलीस स्टेशन, येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.                                  

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावालकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक स्वाती पवार, पो हवा शरद हॆबाडे, पोना युवराज खांडवी, चा पो हवा संतोष गांगुर्डे यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group