लाच घेणाऱ्या शिपायासह ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात
लाच घेणाऱ्या शिपायासह ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात
img
दैनिक भ्रमर


नाशिक :- 6 हजारांची लाच घेणाऱ्या ग्रामपंचायतीच्या शिपायासह ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

मनोज सुर्यकांत घोडके (वय 34), ग्रामसेवक राजुरा ता. मुक्ताईनगर  जि.जळगांव, वर्ग 3 व सचिन अशोक भोलाणकर (वय 23) ग्रामपंचायत शिपाई, राजुरा ता. मुक्ताईनगर, जि. जळगांव वर्ग 4 असे लाच घेणाऱ्या दोघांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचे आईच्या नावाचे घर व प्लॉट आहे. त्यांना सदर घर व प्लॉट वर आईचे नाव कमी करून तक्रारदार यांचे फेरफार नाव लावण्यासाठी तक्रारदार यांनी ग्रामपंचायत राजुरा येथे अर्ज केला होता. त्याप्रमाणे तक्रारदार यांचे फेरफार वर नाव लावण्यासाठी 11000 रुपये लाचेची मागणी ग्रामसेवक यांनी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी दि. 15/05/2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती.

सदर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे दि.15/05/2024 रोजी पडताळणी केली असता आलोसे यांनी पंचा समक्ष 11000 हजार रुपयाची लाचेची मागणी केली. त्यानतर घोडके यांचे सांगणे वरून  भोलाणकर यांनी राजुरा ग्रामपंचायत येथे सहा हजार रुपयाची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचेवर मुक्ताईनगर पोलीस स्टेशन जि. जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार, पोलीस उप अधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, सफौ दिनेशसिंग पाटील ,पो.ना. बाळू मराठे, पोकॉ प्रणेश ठाकूर, पो.हे.कॉ. सुरेश पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे,मपोहेकॉ शैला धनगर , पो. ना. किशोर महाजन, पो.कॉ. प्रदीप पोळ, पो. कॉ. राकेश दुसाने, पो. कॉ. अमोल सुर्यवंशी, पो. कॉ. सचिन चाटे यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group