लाच घेताना विद्युत वितरण कंपनीचा लिपिक जाळ्यात; नाशिक जिल्ह्यातील प्रकार
लाच घेताना विद्युत वितरण कंपनीचा लिपिक जाळ्यात; नाशिक जिल्ह्यातील प्रकार
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- 7 हजार रुपयांची लाच घेताना विद्युत वितरण कंपनीच्या लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

समाधान त्र्यंबक हिवाळे (रा. प्लॉट नंबर 15, सारथी अपार्टमेंट, नरहरी नगर, पाथर्डी ,नाशिक) उच्च स्तरीय लिपिक , मनमाड, म. रा. वि.वि. कंपनी असे लाच घेणाऱ्या लिपिकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार हे बाह्य स्त्रोत तंत्रज्ञ म्हणून काम करतात. तक्रारदार व त्याचे तीन मित्र असे यांची बदली एका विभागातून दुसऱ्या विभागात करण्यासाठी प्रत्येकी तीन हजार असे बारा हजार रुपये असे तक्रारदार यांच्याकडून मागितले होते.

बारा हजार पैकी पाच हजार तक्रारदार यांच्या मित्राने काही दिवसापूर्वीच फोन पे केले होते उर्वरित 7000 रुपयांसाठी हिवाळे यांनी तक्रारदार याच्याकडे तगादा लावला होता. आज तक्रारदार यांनी ला.प्र. वि नाशिक येथे संपर्क साधून तक्रार केली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई केली. हिवाळे यांनी लाचेची मागणी करून लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी. निलिमा सविता केशव डोळस, पोह. संदीप वनवे, पो.ना. संदीप हांडगे, पो. शि. सुरेश चव्हाण यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group