२ लाख रुपयांची लाच घेताना महिला अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात
२ लाख रुपयांची लाच घेताना महिला अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात
img
दैनिक भ्रमर
नाशिक : 2 लाख रुपयांची लाच घेताना धुळ्याच्या शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिक्षकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
मीनाक्षी भाऊराव गिरी, (वय 41), अधीक्षक, शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय, धुळे, अतिरिक्त कार्यभार- अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय, धुळे. (वर्ग २), रा. - अभियंता कॉलनी, वाडी भोकर रोड, गणपती मंदिराजवळ, धुळे मुळ रा. मु. पो. लोणी, ता. आर्णी, जि. यवतमाळ असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

 याबाबत माहिती अशी की, तक्रारदार व त्यांची पत्नी हे महानगरपालिका हायस्कूल धुळे येथे विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहे. त्यांचे एप्रिल 2022 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीतील थकीत वेतन व सातव्या वेतन आयोगाचा 3 व 4 हप्ता महाराष्ट्र शासनाच्या निर्णयान्वये मंजूर झालेला आहे. हे थकीत वेतन तक्रारदार व त्यांची पत्नी यांना अदा करण्यासाठी गिरी यांनी तक्रारदार यांच्याकडे 2,00,000 रूपये लाचेची मागणी केली. ही रक्कम त्यांचे कार्यालयात स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी, पो. हवा. राजन कदम, पो. कॉ. प्रशांत बागुल, पो. कॉ. प्रवीण पाटील यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group