Nashik : 10 हजारांची लाच घेताना उपशिक्षकासह मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात
Nashik : 10 हजारांची लाच घेताना उपशिक्षकासह मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात
img
दैनिक भ्रमर


नाशिक :- 16 हजारांची लाच मागून पहिला हप्ता म्हणून 10 हजारांची लाच घेताना उप शिक्षकासह मुख्याध्यापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

सुभाषचंद्र कौशलप्रसाद मिश्रा (वय 56) मुख्याध्यापक श्री शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालय श्रमिक नगर, सातपूर, नाशिक व दिनेशकुमार  जमुनाप्रसाद पांडे (वय 57) उप शिक्षक श्री शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालय श्रमिक नगर ,नाशिक अशी लाच घेणाऱ्या दोघांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांची दोन मुले महानगरपालिका शाळा सातपूर नाशिक येथे मराठी माध्यमात इयत्ता 7 वी मध्ये शिकत आहेत.परंतु तक्रारदार हे मूळचे बिहार येथील राहणारे असुन हिंदी भाषिक आहेत. तेंव्हा त्यांच्या मुलांसाठी मराठी माध्यमात शिकण्यास अडचण येत असल्याने  त्यांना शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालय, श्रमिकनगर, सातपूर, नाशिक या शासन अनुदानित शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा होता.

त्यासाठी त्यांनी 29 एप्रिल रोजी मुख्याध्यापक मिश्रा व उप शिक्षक पांडे यांना भेटुन प्रवेश देण्याबाबत विनंती केली. त्यावेळी मुख्याध्यापक  मिश्रा व उपशिक्षक पांडे यांनी तक्रारदाराच्या दोन मुलांसाठी प्रत्येकी 8 हजार अशी सोळा हजार रुपयांची इमारत निधीच्या नावाखाली लाचेची  मागणी केली होती व त्याची कोणतीही पावती मिळणार नसल्याचे सांगितले होते.

आज तक्रारदार पुन्हा त्यांचे मुलांचे शाळा प्रवेशासाठी मुख्याध्यापक मिश्रा व उप शिक्षक पांडे यांना शाळेत भेटले असता त्यांनी  16000 रुपये लाचेची इमारत निधीच्या नावाखाली मागणी करून त्याची कोणत्याही प्रकारची रिसीट /पावती देण्यास नकार देऊन 16000 रुपयांपैकी 10000 रुपये पहिला हप्ता म्हणुन उप शिक्षक दिनेशकुमार पांडे यांनी स्वीकारला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक विश्वजीत जाधव, पो. ह .प्रणय इंगळे, पो .ह .सुनिल पवार, पो. ह .सचिन गोसावी, पो. ना .दिपक पवार यांनी केली
इतर बातम्या
Join Whatsapp Group