लाच घेणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या लॉकर मध्ये सापडले
लाच घेणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या लॉकर मध्ये सापडले "इतके" घबाड
img
दैनिक भ्रमर

माजलगाव पाटबंधारे विभाग, परळी वर्ग 1 चे कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकर यांना 28 हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती.

त्यांच्या अंबाजोगई येथील घर झडती दरम्यान लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला मिरज येथील युनियन बँकेच्या लॉकरची चावी मिळाली होती. हे लॉकर कायदेशीर प्रक्रिया करून सिल करण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार या लॉकरची झडती घेण्यात आली.

त्यात पथकाला ११ लाख ८९ हजार रुपये रोख, एक कोटी पन्नास लाख रुपये किमतीचे २ किलो १०५ ग्रॅम वजनाचे सोने त्यात १११४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे ७ बिस्कीट, ९९१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, असा एकूण १ कोटी ६१ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

इतर बातम्या
Join Whatsapp Group