नाशिक - पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्ग यांच्या घराची झडती घेऊन त्यांच्या घरातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 3 लाख रुपये रोख व त्यांचे पासपोर्ट देखील जप्त करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात 8 मे रोजी सायंकाळी वस्तु संग्रहालय नाशिक विभागाच्या सहाय्यक संचालक आरती आळे यांना दीड लाख रुपयांची लाच घेताना अटक केली होती. या प्रकरणामध्ये सहभागी असलेले पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांनी आपल्या वाट्याची रक्कम स्वीकारण्यासाठी संमती दर्शविली होती. त्यानंतर त्यांनाही या प्रकरणांमध्ये आरोपी करण्यात आले होते.
पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांनी आपली अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीनाचा अर्ज दिला होता. त्यानंतर ते फरार झाले होते. त्यांचा शोध सुरूच आहे. पण या दरम्यान नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबई येथील महालक्ष्मी रेस कोर्स येथे लाला कॉलेजमध्ये असलेल्या सोसायटीमधील फ्लॅट क्रमांक वीस मध्ये राहत असलेले तेजस गर्गे यांच्या पत्नीसमोर त्यांच्या घराची झडती घेतली आहे.
या झडतीमध्ये प्रशांत गर्ग यांचे पुणे, औरंगाबाद येथील बँकेचे अकाउंट सापडले आहे. तसेच घरामध्ये 3 लाख 18 हजार रुपये रोख एक टीबीच्या 2 हार्ड डिस्क आणि याचबरोबर तेजस गर्गे व त्यांची पत्नी विशाखा गर्गे या दोघांचेही पासपोर्ट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जप्त केले आहेत.