एक लाख रुपयांची लाच घेताना ग्रामसेवकासह एक जण जाळ्यात
एक लाख रुपयांची लाच घेताना ग्रामसेवकासह एक जण जाळ्यात
img
दैनिक भ्रमर

एक लाख रुपयांची लाच घेताना ग्रामसेवकासह ग्रामपंचायत ऑपरेटरला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. हेमंत कमलाकर जोशी, ग्रामसेवक चुंचाळे ता. यावल रा. साकळी ता. यावल, जि.जळगांव व सुधाकर धुळकू कोळी (वय 35 रा. चुंचाळे ता. यावल) ग्रामपंचायत ऑपरेटर अशी लाच घेणाऱ्या दोघांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचे चुंचाळे ता. यावल गावी वडीलांच्या नावाची संस्था असून त्यामध्ये 15 वित्त आयोगाच्या शिफारशी मधुन गावात शिलाई मशिन प्रशिक्षण देवून ग्रामीण भागातील महिला व युवतीना स्वावलंबी करणाचे योजनेचा केंद्र शासन कडून दोन लाख रुपये निधी मंजूर झाला होता.

या मंजुरीचे रक्कमे तून 50 टक्के प्रमाणे बक्षीस म्हणून एक लाख रुपये लाचेची मागणी ग्रामसेवक जोशी यांनी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी दि.16 फेब्रुवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे पंचा समक्ष पडताळणी केली असता दोघांनी लाचेची मागणी केली.

त्यानंतर आज ग्रामसेवक जोशी यांनी सांगितल्याने कोळी यांनी चुंचाळे ग्रामपंचायत येथे एक लाख रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचेवर यावल पोलीस स्टेशन ता. यावल जि. जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. कोळी यास ताब्यात घेण्यात आले असुन ग्रामसेवकाचा शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, सफौ दिनेशसिंग पाटील , पो.ना. बाळू मराठे , पोना सुनिल वानखेडे, एन. एन. जाधव , पोलीस निरीक्षक स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर ,पो.ना.किशोर महाजन, पो.कॉ. प्रदीप पोळ, पो.कॉ,पो. कॉ.प्रणेश ठाकुर, पो. कॉ. अमोल सूर्यवंशी यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group