15 हजारांची लाच घेताना विद्युत निरीक्षक जाळ्यात
15 हजारांची लाच घेताना विद्युत निरीक्षक जाळ्यात
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- 15 हजारांची लाच घेताना विद्युत निरीक्षकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

गणेश नागो सुरळकर (वय 52) असे लाच घेणाऱ्या विद्युत निरीक्षक वर्ग 1  खाते उद्योग,उर्जा व कामगार विभाग जळगांव जि.जळगांव चे नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे कंत्राटदार असून ते शासनाचे इलेक्ट्रिकल कामे करीत असतात. त्यांच्या कडे यासाठी लायसन आहे. हे लायसन नूतनीकरण करण्यासाठी तक्रारदार यांनी सुरळकर यांचेकडे अर्ज केला होता. या लायसनचे नूतनीकरण करण्यासाठी सुरळकर यांनी तक्रारदार यांचेकडे 15 हजार रुपये लाचेची मागणी केली.

ही रक्कम आज लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांचे विरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सुहास देशमुख, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, पो.ह.रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पो.ना. किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे, पोना बाळू मराठे पोशी अमोल सूर्यवंशी, सफौ दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील,पोकॉ प्रदिप पोळ, पोकॉ. राकेश दुसाने, पो.कॉ. प्रणेश ठाकुर.यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group