४० हजारांची लाच घेताना पोलीस अधिकारी जाळ्यात
४० हजारांची लाच घेताना पोलीस अधिकारी जाळ्यात
img
दैनिक भ्रमर

४० हजारांची लाच घेताना पोलीस अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. आरिफअली सैय्यद युसुफअली सैय्यद (वय 55) असे धुळे येथील आझाद नगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्याकडून दाखल गुन्ह्यात सय्यद हे तपास अधिकारी आहेत. सदर गुन्ह्यात गोठवण्यात आलेली विम्याची रक्कम मिळणेकरिता कोर्टात दाखल केलेल्या अर्जावर तपास अधिकारी यांचा अभिप्राय देण्याकरिता सय्यद ने तक्रारदाराकडे  50,000 रुपयांची लाच मागितली.  तडजोडी अंती 40,000 स्वीकारण्याचे त्याने मान्य केले. 

ही लाचेची  रक्कम स्वीकारताना सय्यद यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, हेमंत बेंडाळे, पो. हवा. राजन कदम,पो.ना. संतोष पावरा,रामदास बारेला, प्रविण पाटील,सुधीर मोरे, मकरंद पाटील, प्रशांत बागुल यांनी केली. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group