नगरच्या मनपा आयुक्तांनी स्वीय सहाय्याकामार्फत मागितली 8 लाखांची लाच
नगरच्या मनपा आयुक्तांनी स्वीय सहाय्याकामार्फत मागितली 8 लाखांची लाच
img
चंद्रशेखर गोसावी

नाशिक (चंद्रशेखर गोसावी):- बांधकाम व्यावसायिकाकडून 8 लाखांची लाच मनपा आयुक्तांनी सहाय्यकामार्फत मागितल्या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

डॉ. पंकज जावळे (वय 47) आयुक्त तथा प्रशासक महानगरपालिका, अहमदनगर, मूळ रा.माजलगाव जि.बीड, सध्या राहणार - शासकीय निवासस्थान, अहमदनगर व श्रीधर देशपांडे (वय 48) लिपिक टंकलेखक  अतिरिक्‍त पदभार स्विय सहायक आयुक्त महानगरपालिका, अहमदनगर रा.अहमदनगर अशी लाच मागणाऱ्या दोघांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार हे त्यांचे भागीदारांसह बांधकाम व्यवसाय करतात. त्यांनी अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील मौजे नालेगाव येथे 2260.22 चौरस मीटर प्लॉट खरेदी केलेला आहे. सदर प्लॉटवर तक्रारदार यांना त्यांचे भागीदारांसह बांधकाम करावयाचे असल्याने त्यांनी बांधकामासाठी लागणारी बांधकाम परवानगी मिळण्यासाठी महानगरपालिका  कार्यालय अहमदनगर येथे दि. 18.03.2024 रोजी ऑनलाईन अर्ज 254531 या क्रमांकाने केला. 

या परवानगी साठी आयुक्त जावळे यांनी देशपांडे यांच्या मार्फत 9,30,000 रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना डॉ. जावळे आणि त्यांचे स्विय सहाय्यक देशपांडे यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अँटी करप्शन ब्युरो, जालना कार्यालयाकडे दिनांक 19.06.2024 रोजी तक्रार दिली.

तक्रारदार यांच्या तक्रारी वरून लाच मागणी पडताळणी  दि. 19 व 20 जून रोजी केली असता देशपांडे यांनी तक्रारदार यांच्याकडे  मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या कडून बांधकाम परवानगी मिळवून देण्यासाठी 8,00,000 रुपये लाचेची मागणी पंचा समक्ष केली. लाच मागणी पडताळणी दरम्यान मनपा आयुक्त हे देशपांडे यांना तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी  करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे विरुद्ध, त्यांचेविरुद्ध पोलीस ठाणे तोफखाना  जि. अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक किरण बिडकर, पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर, पोलीस अंमलदार गजानन घायवट, शिवाजी जमधडे, गणेश चेके, गणेश बुजाडे, शिवलिंग खुळे, अतिश तिडके, गजानन खरात विठ्ठल कापसे व भालचंद्र बिनोरकर यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group