लाच घेताना पोलीस हवालदार जाळ्यात
लाच घेताना पोलीस हवालदार जाळ्यात
img
दैनिक भ्रमर
 
नाशिक : लाच घेताना पोलीस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. दिलीप बाजीराव निकम (वय 57) असे लाच घेणाऱ्या हवालदाराचे नाव आहे. निकम यांनी नेमणूक पवारवाडी पोलीस स्टेशन येथे आहे.
       
 याबाबत अधिक माहिती अशी आहे की, तक्रारदार हे शेती खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असून, तक्रारदार यांनी त्यांच्या मित्रास  बहिणीच्या लग्नासाठी हातउसणे म्हणून दोन महिन्यांच्या बोलीवर ५०,००० रुपये दिले होते. दोन महिने पुर्ण होवूनही तक्रारदार यांचा मित्र हा वायदे वर वायदे देऊनही पैसे देत नसल्याने त्यांच्यात हातापाई झाली होती.

म्हणून तक्रारदार यांचा मित्र काल दिनांक २३/०४/२०२४ रोजी पोलीस स्टेशन पवारवाडी येथे तक्रारदार यांचे विरुद्ध तक्रार देण्यासाठी गेला होता. पो.हवा. निकम यांनी तक्रारदार यांना फोन करुन पोलिस स्टेशन पवारवाडी , मालेगांव येथे बोलाविले. म्हणून तक्रारदार यांनी त्यांचे दाजी यांना पवारवाडी पोलीस स्टेशन येथे निकम यांना भेटण्यास पाठविले.

निकम यांनी तक्रार न घेणे व काँप्रमाइज करून देण्याच्या बदल्यात ५००० रुपयाची मागणी केली. नंतर तक्रारदार, त्याचे दाजी निकम यांना भेटण्यासाठी गेला असता, तक्रारदार याचा मित्र याची तक्रार न घेता कॉमप्रॅमाइज करणे व तक्रारदार यांचे पैसे काढून देण्यासाठी प्रथम ५००० रुपयेची मागणी करून, तडजोडी अंती, ३००० रुपयेची मागणी केली.

ही रक्कम दिनांक २४/०४/२०२४ रोजी स्वीकारण्यास संमती देऊन आज दिनांक २४/०४/२०२४ रोजी ३०००  रुपये तक्रारदार यांचेकडून स्वीकारून , स्वीकारलेल्या ३००० रुपये रकमेपैकी १००० रुपये तक्रदार यांना परत केली, अशाप्रकारे पो.हवा. निकम यांना आज मालेगांव कोर्ट आवारात २००० रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले असून निकम यांचेवर छावणी पोलीस स्टेशन, मालेगांव शहर येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक चौधरी, पोलीस शिपाई अनिल गंगोडे, पो.हवा. पंकज पळशीकर, चालक पो.हवा. विनोद पवार यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group