50 हजारांची लाच घेताना शिक्षणाधिकाऱ्यास अटक
50 हजारांची लाच घेताना शिक्षणाधिकाऱ्यास अटक
img
दैनिक भ्रमर

50 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिक्षणाधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले आहे.

सतिष सुरेश चौधरी (वय ५२), जिल्हा शिक्षणाधिकारी, प्राथमिक, नंदुरबार, वर्ग-१ असे लाच घेणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांना नवापूर शहर, नगरपालिका, मालमत्ता क्र. ८२६, सीटी सर्वे क्र. ६२४, पंचरत्न शॉपिंग, काँप्लेक्स येथे हॉटेल नम्रता सुरु करावयाची असल्याने सदर परिसरात ७५ मीटर अंतरावर बंद पडलेली जिल्हा परिषद शाळा असल्याने उत्पादन शुल्क विभागाने FL ३ परवाना देण्यास हरकत घेतली.

परंतु सदर शाळा इमारत ही जीर्ण होऊन बंद असल्याने नंदुरबार प्राथमिक शिक्षण विभाग कडून सदर शाळा बंद असले बाबत प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अशरफ भाई माजिदभाई लखानी अल्पसंख्यांक विकास बहुउद्देशीय संस्था नवापूर, या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माद्यमिक विद्यालय नवापूर शाळेची आर टी ई मान्यता वर्धित करण्याचे काम करुन दिल्याचे बदल्यात बक्षीस म्हणून असे दोन्ही कामांचे मिळून चौधरी यांनी ५०००० रुपयांची मागणी केली. चौधरी यांचे जिल्हा परिषद कार्यालयातील दालनात ५०००० लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्यावर नंदुरबार शहर पोलीस येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस नाईक चौधरी, पोलीस शिपाई अनिल गांगोडे, पो.ना. गणेश निंबाळकर यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group