मनपाचे सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यावर एसीबीची मोठी कारवाई
मनपाचे सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यावर एसीबीची मोठी कारवाई
img
दैनिक भ्रमर
नाशिक महानगरपालिकेत असताना कायदेशीर उत्पन्नापेक्षा 42 टक्के अपसंपदा केल्या निष्पन्न झाल्याने मनपाचे सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मनपाचे सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल चुडामान महाजन यांनी अग्निशमन महानगर पालिका येथे कार्यरत असतांना दिनांक २२/१०/१९८६ ते दिनांक ३१/०५/२०१८ दरम्यान सेवा कालावधीत कायदेशीर उत्पन्ना पेक्षा एक कोटी एकतीस लाख बेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर रुपये म्हणजेच कायदेशीर उत्पन्ना पेक्षा ४२% एवढी अपसंपदा केल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झाली.

तसेच सदर अपसंपदा संपादित करणे कामी त्यांच्या पत्नी श्रीमती निशा अनिल महाजन यांनी त्यांना प्रोत्साहन दिले म्हणून त्यांचे विरुद्ध मुंबई नाका पोलिस स्टेशन, नाशिक शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे सन २०१८ सुधारणा पूर्वीचे कलम १३(१)(इ) व १२ प्रमाणे आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक अनिल बडगुजर यांनी केली.
इतर बातम्या
नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group