भीषण अपघात ! पिकअप आणि इको कारमध्ये धडक, सहा जण जागीच ठार, ४ गंभीर जखमी
भीषण अपघात ! पिकअप आणि इको कारमध्ये धडक, सहा जण जागीच ठार, ४ गंभीर जखमी
img
दैनिक भ्रमर
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ पिकअप आणि इको कारमध्ये भीषण अपघात झाल्याची  माहिती मिळत आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला असून  चार जण गंभीर जखमी झाले आहेत.  मयतांमध्ये तीन महिलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती कळते आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. कीर्तनाचा कार्यक्रम आटपून घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला. हे सर्व शिंदखेडा शहरातील रहिवासी असून ते कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी वारूळ पाष्टे गावाला गेले होते. दरम्यान कीर्तनाचा कार्यक्रम आटपून घरी परतत असताना नरडाणा शिंदखेडा रस्त्यावरील दसवेल फाट्याजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकप यांनी जोरदार धडक दिली. 

जखमींवरमीं धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.दरम्यान, धक्कादायक म्हणजे पिकअप चालवणारा चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे धुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group