कल्याण : घराचे रजिस्ट्रेशन करून देण्यासाठी कल्याण पूर्वेकडील सहाय्यक दुय्यम निबंधकाच्या पैशांची मागणी केली. ठरलेली रक्कम स्वीकारताना सहाय्यक दुय्यम निबंधकाला ठाणे अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या अधिकाऱ्याला ताब्यात घेत तपास सुरु करण्यात आला आहे.
कल्याण पूर्वेकडील असलेल्या कार्यालयातील राज कोळी असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. संबंधित तक्रारदाराने घर घेतल्याने घराचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी राज कोळी यांनी तक्रारदाराकडे २४ हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र इतकी रक्कम देणे शक्य नसल्याने तडजोडअंती बारा हजार रुपये देण्याचे निश्चित झाले होते. मात्र तक्रारदाराने याबाबत ठाणे एसीबीकडे याबाबत तक्रार दिली होती. याची पथकाने पडताळणी करत सापळा रचला.
दरम्यान ठरल्यानुसार तक्रारदार आज सकाळच्या सुमारास कल्याण पूर्वेकडील सहदुय्यम निबंधक कार्यालयात आले. यावेळी राज कोळी यांनी तक्रारदाराकडून १२ हजार स्वीकारताना ताब्यात घेतले आहे.
ठाणे अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचत ही कारवाई केली आहे. राज कोळी यांच्यासोबत एका खाजगी इसमाला देखील ठाणे अँटी करप्शन ब्युरोने ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.