नाशिक :- 50 हजार रुपयांची लाच मागून तडजोडी अंती 40 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सटाण्यातील खासगी लेखा परिक्षकाविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. चंद्रकांत गोविंद आहिरे (वय ६१) असे लाच मागणाऱ्या खाजगी लेखा परीक्षकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांची आई चेअरमन असलेल्या कै. द्रोपदबाई दादाजी काकडे, बीजोरसे या पतसंस्थेची नोंदणी रद्द न करता सदर पतसंस्था पुनर्जीवित करून देण्यासाठी आहिरे यांचेशी असलेल्या ओळखीचा फायदा घेऊन आहिरे यांचे ओळखीचा तक्रारदार यांच्यावर प्रभाव पडून तक्रारदार यांचे काम करण्याचे भासवून लाचेची मागणी केली. म्हणून आहिरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती वैशाली पाटील, पो हवा शरद हेंबाडे, पोना अविनाश पवार, चालक शिपाई जाधव, पो हवा सचिन गोसावी, चापोहवा संतोष गांगुर्डे, तसेच , पो ना राजेंद्र गीते, चंद्रशेखर मोरे यांनी केली.