धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मोटरसायकल व पाण्याचे विद्युत मोटारी लांबवणारी ७ जणांची टोळी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून १५ मोटरसायकल, एक बॅटरी व सहा जलपरी मोटर असा ४ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
धुळे जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी एलसीबीचे निरीक्षक श्रीराम पवार यांना सुचना दिल्यानंतर पवार यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली. या पथकाला मिळालेल्या गुप्त माहिती नुसार, सुदाम ठाकरे रा. कावठी ता. धुळे याच्यासह त्याच्या इतर साथीदाराना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या सर्वांनी धुळे जिल्ह्यातून ठिक ठिकाणाहून मोटरसायकल आणि पाण्याच्या विद्युत मोटर असा एवज चोरी केली असल्याची कबुली दिली. संशयित असलेल्या आरोपी यांच्याकडून १५ मोटरसायकल, एक बॅटरी व सहा जलपरी मोटर असा एकूण ४ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.