मोठी बातमी! ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ; जामिनाचा मार्ग मोकळा?
मोठी बातमी! ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ; जामिनाचा मार्ग मोकळा?
img
Dipali Ghadwaje
 पुणे : एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना ड्रग्ज पार्टी प्रकरणी 14 दिवसांची न्यायालीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. पण न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळली आणि आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे प्रांजल खेवलकरांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

त्यामुळे रेव्ह पार्टीप्रकरणात अटकेत असलेले एकनाथ खडसे  यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे.

चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्यांना गुरुवारी न्यायालयीन कोठडी  सुनाविण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांचे वकील जामिन मिळविण्यासाठी अर्ज करणार आहेत.

नेमकं काय प्रकरण ?
पुण्यातील खराडी भागातील एका हॉटेलमध्ये रेव्ह पार्टीवर धाड टाकून पोलिसांनी डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच पुरुष आणि दोन महिलांना पकडले. पोलिसांनी घटनास्थळावरुन दारू, अमली पदार्थ आणि हुक्का जप्त केला. त्यांच्याकडून सुमारे पावणे तीन ग्रॅम कोकन जप्त केल आहे. प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधानपरिषद सदस्य एकनाथ खडसे यांचे जावई आणि महिला प्रदेशाध्यक्षा रोहणी खडसे यांचे पती आहे. प्रांजल खेवलकर यांना दोनदा चार दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली होती. गुरुवारी त्यांची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले.

खेवलकरांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ, चॅट आढळून आला आहे. आरोपींनी तपासात सहकार्य केले नाहीत. सिगारेट पाकीट टेबलवर ठेवले होते. त्यात अंमली पदार्थ सापडला आहे. खेवलकर यांच्याकडे बऱ्याच गोष्टींचा तपास करायचा आहे. अंमली पदार्थ कुठून आणला तिथ आला कसा याचा शोध घ्यायचा आहे. किती पार्ट्या झाल्या आहेत. त्यामध्ये काय घडलं हे सगळं शोधायचं आहे, त्यामुळे खेवलकर यांना पोलिस कोठडीची मागणी तपास अधिकारी यांनी केली.

 खेवलकर यांच्या वकिलांनी युक्तिवादात सगळ्या बाजूने तपास झालेला आहे. आता तपासासाठी पोलिस कोठडीची आवश्यकता नाही. मोबाईलमध्ये काही सापडलं तर त्याला कोठडी मागायची काय गरज आहे. चॅट मिळाले आहेत. तर कोठडीची गरज काय आहे. खेवलकर यांचे दुसरे वकील विजय ठोंबरे यांनी बाजू मांडताना म्हटलंय की पोलीस न्यायालयाची फसवणूक करत आहेत धूळफेक करत आहे.

केवळ खेवलकर यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारण माल चाहिय हा मेसेज आज कुठून आला. पूजा सिंग ही महिला आरोपीला प्लांट केलेली आहे. खेवलकर यांचा आणि पूजा सिंगचा काही संबंध नाही, त्यामुळे पोलिस कोठडी देऊ नये, अशी मागणी विजय ठोंबरे यांनी केलीय. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने प्रांजल खेवलकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group