गुजरातमध्ये तब्बल 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त ; 'इतक्या' जणांना अटक
गुजरातमध्ये तब्बल 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त ; 'इतक्या' जणांना अटक
img
Dipali Ghadwaje
 पोरबंदर : गुजरातचा समुद्र किनारा हा ड्रग्जचं आगार झाल्याची परिस्थिती आहे. कारण, इथं पुन्हा एकदा ड्रग्जचा मोठा साठा सापडला आहे. कच्छमधील पोरबंदर किनारपट्टीवरून तब्बल ३३०० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. भारतीय नौदल, एनसीबी आणि गुजरात एटीएसने ही संयुक्त कारवाई केली आहे. 

जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जमध्ये ३०८९ किलो चरस, १६० किलो मेथॅम्फेटामाइन आणि २५ किलो मॉर्फिनचा समावेश आहे. याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल २००० कोटी रुपये असल्याचं समजतंय. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. धक्कादायक बाब म्हणजे ड्रग्जच्या पॅकेटवर पाकिस्तानचं नाव आढळून आलंय.



नौदल, एनसीबी आणि एटीएसने केलेल्या या संयुक्त कारवाईत  ५ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामुळे ड्रग्ज रॅकेटचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.  भारतीय नौदलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपासून गुजरात येथील समुद्राच्या सीमेवर एक अज्ञात बोट उभी होती. ही बोट भारताच्या हद्दीत घुसल्यावर तिला थांबवून तपासणी करण्यात आली.

यावेळी बोटीत ३३०० कोटींचे ड्रग्ज आढळून आले, नौदलाने कारवाई करत बोटीतील ५ क्रू मेंबर्सना ताब्यात घेतले. पकडलेल्या बोटीतील ताब्यात घेतलेले ५ आरोपी पाकिस्तानी असल्याचा संशय आहे. सध्या त्यांची कसून चौकशी केली जात असून आरोपींना गुजरातमधील पोरबंदर येथे नेण्यात आले आहे.

दरम्यान, हे ड्रग्ज कुठून आले आणि याचा पुरवठा नेमका कुणाला केला जाणार होता, याबाबत सध्या चौकशी केली जात आहे. तसेच या ड्रग्जशी इतर किती लोक जोडलेले आहेत. याचा शोध देखील घेतला जात आहे. जप्त केलेल्या ड्रग्जवर 'Produce of Pakistan' असे नाव लिहण्यात आले होते.

 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group