एटीएसची मोठी कारवाई; ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक
एटीएसची मोठी कारवाई; ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक
img
Dipali Ghadwaje
एटीएसने गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई करत इसिसच्या ४ दहशतवाद्यांना अटक केली आहे. केंद्रीय एजन्सींनी दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे चौघांना अटक केल्याची माहिती आहे. ऐन निवडणुकीत केलेल्या या कारवाईनंतर एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सर्वजण मूळचे श्रीलंकेचे रहिवाशी आहेत. हे दहशतवादी अहमदाबादला का आले होते, तिथे कोणाच्या संपर्कात होते का याचा तपास सध्या तपास यंत्रणांकडून सुरू आहे.
crime | ATS |
इतर बातम्या
Join Whatsapp Group