'दहशतवादी तयार आहेत, देशात 26/11 सारखे बॉम्बस्फोट घडवून आणतील'
'दहशतवादी तयार आहेत, देशात 26/11 सारखे बॉम्बस्फोट घडवून आणतील'
img
दैनिक भ्रमर
गुजरात सायबर सेल आणि एटीएस टीमने देशात २६/११ सारख्या बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. आरोपींनी 6 मार्च रोजी सरकारी यंत्रणांना ई-मेल पाठवला होता. यामध्ये त्याने २६/११ सारखे बॉम्बस्फोट घडवून आणले जातील, अशी धमकी दिली होती.

यानंतर गुजरात सायबर सेल आणि एटीएसने सतर्क होऊन कारवाई सुरू केली.  तांत्रिक निगराणीच्या मदतीने धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या शोधात एटीएसचे पथक ओरिसात पोहोचले आणि तेथून त्याला अटक केली. 

मिळालेल्या माहितीनुसार , जावेद अन्सारी असे आरोपीचे नाव आहे. तो कार पेंटिंग आणि पॉलिशिंगचे काम करतो. दहशतवादी स्फोटासाठी तयार असल्याचा दावाही जावेदने धमकीच्या ई-मेलमध्ये केला होता. जावेदला अटक केल्यानंतर एटीएस आता त्याची चौकशी करत आहे. त्याच्यासोबत इतर लोकही सामील झाले आहेत का, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत अद्याप चौकशी सुरू आहे.

लष्कराच्या दहशतवाद्यांनी देश हादरवला 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानातील 10 लश्कर दहशतवाद्यांनी मुंबईत दहशत निर्माण केली होती.  या हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 हून अधिक जण जखमी झाले होते. पाकिस्तानातील लष्कराचे दहशतवादी बोटीच्या मदतीने समुद्रमार्गे मुंबईत पोहोचले होते. अनेक ठिकाणी त्याच्या क्रूरतेच्या  खुणा सोडल्या होत्या. 

मुंबईत एवढा मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची सुरुवातीला कुणालाही कल्पना नव्हती.  या हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला होता. 
crime | ATS |
इतर बातम्या
Join Whatsapp Group