नाशिकरोडला एम डी विक्री करणारे तिघे ताब्यात...अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
नाशिकरोडला एम डी विक्री करणारे तिघे ताब्यात...अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- चारचाकी गाडीतून विक्री साठी नेत असलेल्या पाच लाख किंमतीचे एमडी म्हणजे मॅफेड्रॉन अमली पदार्थविरोधी पाथकाने ताब्यात घेतले असून, या प्रकरणी दोघा भावांसह एकाच्या पत्नीविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा करण्यात आला आहे.

 याबाबत पोलिसांनी सांगितले, की फैसल शफिन शेख (वय २६), शिबान शफिन शेख (वय २५) हे दोघे भाऊ व शिबानची पत्नी हिना शिबान शेख (वय २९, सर्व रा. २१, श्रीनाथ कृपा, माहेश्वरी भवन, आर्टिलरी सेंटर रोड, नाशिकरोड हे पांढर्‍या रंगाच्या स्कोडा कार मधून नाशिकरोड बस स्थानक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागून सत्कार पॉईंटकडे जात असताना श्रद्धा हॉटेलजवळ  अमली पदार्थविरोधी पथकाने थांबवले. गाडीची झडती घेतली असता त्यात ९९.५ ग्रॅम वजनाचा सुमारे ४ लाख ९७ हजार ५०० रुपये किमतीचे एमडी म्हणजे मॅफेड्रॉन मिळून आले.

ही कारवाई अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी आदींसह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पाथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवकिसन रुंजा गायकर यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पुढील तपास अमली पदार्थ विरोधी पथक करीत आहे.
मागील वर्षी एमडी नावाने नाशिकरोड गाजले होते.

नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर अशा अनेक पोलिसांनी नाशिकरोड भागातून जवळपास २५ च्या वर एमडी विक्री करणारे ताब्यात घेतले आहेत. ललित पाटील हा तर शिंदे गावात एमडी चा कारखाना टाकून राज्यभरात त्याची विक्री करायचा. या प्रकरणी अनेक पोलीस अधिकार्‍यांना जबाबदार धरून त्यांच्या बदल्या झाल्या होत्या. आता हे प्रकरण कुठपर्यंत जाते, याचा तपास होत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group