NCB ची मोठी कारवाई! २०० कोटींचे ड्रग्स जप्त केले ; चार आरोपींना अटक
NCB ची मोठी कारवाई! २०० कोटींचे ड्रग्स जप्त केले ; चार आरोपींना अटक
img
Dipali Ghadwaje
नवी मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने मोठी कारवाई करत चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून विविध प्रकारचे ड्रग्ज देखील जप्त केले. या ड्रग्जची एकूण किंमत सुमारे २०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने ११.५४० किलो उच्च दर्जाचे कोकेन, ४.९ किलो हायब्रिड स्ट्रेन हायड्रोपोनिक चरस/गांजा, २०० पॅकेट गांजा जप्त केला आहे.

याआधी एनसीबीने जानेवारी महिन्यात कारवाई केली होती. त्यावेळी फक्त २०० ग्रॅम कोकोन जप्त केले होते, त्यावेळी मोठ्या साठ्याची एनसीबीलाला माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, एनसीबी मुंबई टीमने पुढील कारवाई करण्यास सुरुवात केली.

एनसीबीला तांत्रिक माध्यमातून तस्करीच्या स्रोतापर्यंत पोहोचण्यात यश आले. ३१ जानेवारी रोजी नवी मुंबईतून पथकाने ११.५४० किलो उच्च दर्जाचे कोकेन, ४.९ किलो हायब्रिड स्ट्रेन हायड्रोपोनिक चरस/गांजा आणि २०० पॅकेट कॅनॅबिस गमी आणि १,६०,००० रुपये रोख जप्त केले.

एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला मुंबईतील एका आंतरराष्ट्रीय कुरिअर एजन्सीकडून एक पार्सल सापडले. हे पार्सल ऑस्ट्रेलियाला पाठवायचे होते. एनसीबीने तपास पुढे नेला तेव्हा यातील आणखी ड्रग्ज नवी मुंबईमध्ये लपवल्याची माहिती मिळाली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group