राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. प्रांजल खेवलकर यांना काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टीच्या आरोपाखाली पकडले होते. खेवलकर यांच्या मोबाइलमध्ये काही आक्षेपार्ह चॅट आढळले असे पोलिसांनी सांगितल्याने एकच खळबळ उडाली होती.
आज या संदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहे. प्रांजल खेवलकर हे मुलींना नशा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचे आणि त्या संदर्भात सर्व व्हिडिओ हे त्यांच्या मोबाइलमध्ये आहे.असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
हे ही वाचा !
काय म्हणाल्या रुपाली चाकणकर ?
राज्य महिला आयोगाच्या वतीने पुणे पोलिसांना सूचना दिल्या होत्या, त्यानुसार संस्थेचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. भीषण आणि भयावह अहवाल आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील खराडीत छापा टाकत कारवाई करण्यात आली होती. प्रांजल खेवलकर आणि त्यांचा सहकाऱ्यांना ताब्यात घेऊन कोकेन गांजा, 10 मोबाईल, हुक्का पॉट आणि अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले होते. हडपसरच्या घरातून जप्त केलेल्या मोबाईलमध्ये हिडन फोल्डरमध्ये नग्न फोटो आणि व्हिडिओ आढळले होते, अशी खळबळजनक माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
हे ही वाचा !
मुलींना गोवा, लोणावळा, साकिनाका, जळगाव या ठिकाणी बोलवल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. या मुलींसोबत लैगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं असून अनैतिक मानवी तस्करीचे रॅकेट असण्याची शक्यताही रुपाली चाकणकर यांनी वर्तवली आहे. प्रांजळ खेवलकर यांच्या मोबाईलच्या हिडन फोल्डरमध्ये 252 व्हिडिओ, 1497 नग्न फोटो आहेत. मुलींना विवस्त्र करुन नशेत त्यांचे घाणेरडे व्हिडिओ काढण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी पुढे दिली.
'मुलींना अंमली पदार्थ देऊन लैंगिक अत्याचार करून व्हिडिओ काढलेले आहेत. या व्हिडिओचा वापर करून मुलींना परत ब्लॅकमेल करण्यासाठी वापरण्यात आले आहेत. घरात साफसफाई करणाऱ्या मोलकरणीचा व्हिडिओ आणि फोटो वाईट अवस्थेतील आहेत. सिनेमात काम देणे आणि इतर प्रलोभन दाखवून मुलींना बोलवले जात होते, असंही चाकणकर यांनी सांगितले.