धक्कादायक ! एकनाथ खडसेंच्या घरात जबरी चोरी, सोन्यासह रोकड लांबवली
धक्कादायक ! एकनाथ खडसेंच्या घरात जबरी चोरी, सोन्यासह रोकड लांबवली
img
वैष्णवी सांगळे
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगावतील निवासस्थानी चोरी झाली आहे. एकनाथ खडसे यांच्या जळगाव मधील निवासस्थानी चोरट्यांनी मध्यरात्री दरवाजाचे कुलूप तोडत तळ मजला तसेच पहिला मजल्यावरील खोल्यांमधील कपाट उघडून चोरी केलीय. घटनास्थळी पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी दाखल झाले असून त्यांच्याकडून पाहणी केली जात आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे घरकामगार साफसफाई करण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे.



शिवराम नगर भागातील खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. यानंतर काहीच दिवसांनी एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी झाली आहे. सहा ते सात तोळे सोने व 35 हजाराची रोकड लंपास करण्याची माहिती मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.  



एकनाथ खडसे हे सध्या मुक्ताईनगर येथे वास्तव्यास असल्याने त्यांचा जळगावातील बंगला बंद होता. सकाळी त्यांच्या कर्मचाऱ्याने नियमितपणे बंगल्याची पाहणी करण्यासाठी तेथे गेल्यावर घराचे कुलूप तुटलेले आणि घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर कर्मचाऱ्याने तत्काळ खडसे यांना माहिती दिली. खडसे यांनी लगेचच पोलिसांना घटनेची खबर दिली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group