राजकीय घडामोडींना वेग ! शिवसेनेकडून बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी
राजकीय घडामोडींना वेग ! शिवसेनेकडून बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी
img
वैष्णवी सांगळे
राज्यातील २९ महानगर पालिकांच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. महानगरपालिका निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना राज्यात राजकीय वर्तुळात पक्षांतरासह पक्षातून हकालपट्टीचे सत्र सुरु आहे. नाशिकमध्ये भाजपने ५४ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची हकालपट्टी केली आहे. तर दुसरीकडे कल्याण–डोंबिवली मध्ये शिवसेनेने देखील बड्या नेत्याची हकालपट्टी केली आहे. 

महायुतीच्या अधिकृत पॅम्प्लेटमध्ये खोडसाळपणा करून बनावट पॅम्प्लेट सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप एका नेत्यावर ठेवण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणानंतर शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख तथा परिवार सभापती मनोज चौधरी यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

मित्रानेच केला घात , क्षुल्लक कारण अन ताम्हणी घाटात हत्येचा रक्तरंजित थरार

कल्याण–डोंबिवली पॅनल क्रमांक १८ मध्ये भाजपची एक जागा बिनविरोध निवडून आली असून उर्वरित तीन जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये दोन शिवसेना आणि एक भाजपचा उमेदवार रिंगणात आहे. दरम्यान, नेतीवली परिसरात सोशल मीडियावर एक बनावट पॅम्प्लेट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या पॅम्प्लेटवर दोन धनुष्यबाण आणि एक कपाट अशी निवडणूक चिन्ह दाखवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे भाजपचे अधिकृत उमेदवार स्नेहल मोरे यांच्या जागी कमळाऐवजी शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार प्रीती मनोज चौधरी यांचं कपाट चिन्ह दाखवण्यात आलं आहे, तर “आमचं ठरलंय” असा मजकूर टाकण्यात आला आहे.

या बनावट पॅम्प्लेटमुळे मतदारांमध्येच नाही तर भाजप–शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून मनोज चौधरी यांची पक्षविरोधी कारवाया आणि आदेश न पाळल्याच्या कारणावरून शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, मनोज चौधरी आणि अपक्ष उमेदवार प्रीती मनोज चौधरी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group