"प्रभू रामचंद्रांच्या नावावर जे कोणी राजकारण करत असतील त्यांना लखलाभ"- चंद्रशेखर बावनकुळे
img
दैनिक भ्रमर
नाशिक : राम मंदिरा पेक्षाही मोदींनी केलेली विकासकामे ही आम्हाला मतदानासाठी खूप उपयुक्त आहेत आणि त्यातूनच आम्हाला मतदान मिळेल आणि आमचा विजय होईल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. 

नाशिकमध्ये काळाराम मंदिराचे दर्शन घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी काळाराम मंदिराचे विश्वस्त महंत सुधीर दास महाराज, केंद्रीय राज्यमंत्री भरती पवार, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जाधव ,प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण सावजी, गोविंद बोरसे, देवदत्त जोशी, आमदार राहुल आहेर,  आमदार राहुल ढिकले, गिरीश पालवे, दिनकर पाटील, प्राची पवार, पंचवटी मंडळ अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, उत्तम उगले,  यांच्यासह भाजपाचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

पंचवटीतील काळाराम मंदिराबाहेर कार्यकर्त्यांनी ढोल ताशा आणि फटाक्यांची आतषबाजी करत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर त्यांनी मंदिरात जाऊन विधिवत पूजा आणि महाआरती केली. 

त्यानंतर मंदिर परिसरामध्ये माध्यमांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजपने रामा वरती आणि श्रीराम प्रभूंना मध्ये टाकून कोणतेही राजकारण केलेले नाही आम्हाला ते राजकारण करण्याची गरज पण नाही असे स्पष्ट सांगून ते म्हणाले की मागील दहा वर्षांमध्ये भाजपाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी देशाच्या प्रगतीसाठी कार्य केले आहे. त्या कार्याच्या जोरावरच आम्ही पुन्हा लोकसभेमध्ये सत्ता स्थापन करू अशा विश्वास आहे. 

नागरिकांच्या मनामध्येच आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी अतिशय प्रेमाची भावना आहे आणि पुन्हा मोदी यांनी देशाचे नेतृत्व करावं असे मनोमन देशाच्या नागरिकांनी ठरवले आहे.  त्यामुळे आम्हाला श्री प्रभू रामचंद्रांना मध्ये टाकून राजकारण करायचे नाही असे सांगून पाहून कोणी म्हणाले की प्रभू रामचंद्रांच्या नावावरती जे कोणी विरोधी पक्ष राजकारण करत असतील त्यांना यश लाभो हीच प्रभू चरणी प्रार्थना.

नाशिक दौऱ्याची सुरुवात करताना मागील वेळी त्रंबकेश्वरचे दर्शन घेतले होते, आता यावेळी मी शहरांमध्ये आहे म्हणून श्री प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेऊन या ठिकाणावरून नाशिक दौऱ्याची सुरुवात करीत आहे, असे सांगून चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,  श्री प्रभू रामचंद्रनकडे महाराष्ट्र राज्याला यश प्राप्त होवो  तसेच राज्यातील आणि देशातील गोरगरीब शेतकरी व्यवसायिक विद्यार्थी महिला यांना चांगले आरोग्य लाभो यशोप्राप्ती होवो  हीच प्रार्थना केली आहे.  त्यामुळे मला कोणतेही राजकारण या ठिकाणी करायचे नाही आणि करण्याची देखील इच्छा नाही असे त्यांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group