विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून हालचालींना वेग आला असून, राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आउटगोइंग सुरु आहे. निवडणुकीच्या आधी ठाकरे गटही अक्शन मोड मध्ये आल्याचे दिसतेय. दरम्यान, डोंबिवलीतील ठाकरे गटाने शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिंदे गटाचे प्रदेश सचिव दिपेश म्हात्रे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मशाल हाती घेतली.
दिपेश म्हात्रेंसोबतच त्यांचे बंधू, माजी नगरसेवक जयेश म्हात्रे, रुपेश म्हात्रे, रत्नाताई म्हात्रे, सुलोचना म्हात्रे, संगीता भोईर, वसंत भगत, संपत्तीताई शेलार अशा सात माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला..
दिपेश म्हात्रे यांनी पक्षप्रवेश करण्यापूर्वी डोंबिवलीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. हाती घेऊन मशाल, घडवू महाराष्ट्र खुशाल अशा आशयाचे बॅनर संपूर्ण डोंबिवलीत झळकले होते. दिपेश म्हात्रे यांनी शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा घेऊन मुंबईत दाखल झाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांचे स्वागत केले. तुम्ही परत आला याचा आनंद आहे. थोडा आधी निर्णय घेतला असता तर ही गुंडगिरी, जुलूमशाही लोकसभेतच गाडून टाकली असती, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री रविंद्र चव्हाण आणि दिपेश म्हात्रे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले होते. यामुळे दिपेश म्हात्रे हे नाराज झाले होते