मोठी बातमी : दिल्लीतील ऐतिहासिक वास्तू होणार भगव्या रंगाच्या? भाजप खासदाराचे विधान
मोठी बातमी : दिल्लीतील ऐतिहासिक वास्तू होणार भगव्या रंगाच्या? भाजप खासदाराचे विधान
img
Dipali Ghadwaje
दिल्लीतील भाजप आमदार तरविंदर सिंग त्यांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. यावेळी त्यांनी दिल्लीतील ऐतिहासिक वास्तूंचे भगवीकरण करण्यासंदर्भात विधान केलय.

नेमकं काय म्हणाले आमदार तरविंदर सिंग मारवाह?  

दिल्लीतील भाजप आमदार तरविंदर सिंग मारवाह यांचे मोठे विधान समोर आले आहे. देशाची राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक इमारती, बाजारपेठा भगव्या रंगाच्या असतील, असे मारवाह यांनी एका निवेदनात म्हटले.

ऐतिहासिक इमारतींना भगव्या रंगात रंगवले जाईल, असे त्यांनी सांगितले. लाल किल्ला, कुतुबमिनार, हुमायूनचा मकबरा, दिल्ली विधानसभा, कॅनॉट प्लेस, चांदणी चौक भगव्या रंगाच्या असतील. दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हा प्रस्ताव आणला जाईल, असेही त्यांनी सांगितले.  यापूर्वीही भाजप आमदार तरविंदर सिंग मारवाह हे त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आहेत.  त्यामुळे आता पुन्हा त्यांच्या या विधानामुळे देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. 

आमदार तरविंदर सिंग मारवाह कोण आहेत?

आमदार तरविंदर सिंग मारवाह जंगपुरा येथून विजयी झाले. त्यांनी आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांचा पराभव केला. मारवाह यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1959 रोजी नवी दिल्लीत झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण दिल्लीत पूर्ण केले. 1998 ते 2013 पर्यंत सलग तीन वेळा ते काँग्रेस पक्षाकडून जंगपुरा येथून विजयी झाले. जुलै 2022 मध्ये ते भाजपमध्ये सामील झाले आणि त्यांना दिल्ली भाजपच्या शीख सेलचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. मारवाह व्यवसाय चालवतात आणि दिल्लीतील अनेक भाड्याच्या मालमत्तेतूनही कमाई करतात. भाजप नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध केलेल्या वादग्रस्त विधानामुळेही ते चर्चेत राहिले आहेत.

 
BJP |
इतर बातम्या
Join Whatsapp Group