नांदेडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाच्या प्रदेश युवक सचिवासह अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
नांदेड मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्याचसोबत किनवट बाजार समितीचे सभापती आणि ८ संचालकांनी देखील भाजपचे कमळ हाती घेतले. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम, अर्थ सभापती दिनकर दहिफळे, किनवट बाजार समितीचे सभापती गजानन मुंडे तसेच ८ संचालकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयात कमळ हाती घेतले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते.
नांदेडमध्ये शरद पवारांना मोठा धक्का बसला. राष्ट्रवादी शरद पवार गटातून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये किनवटचे प्रदेश युवक सचिव अजित साबळे, किनवट बाजार समितीचे संचालक श्रीराम कांदे, युवक तालुका अध्यक्ष तसेच किनवट बाजार समितीचे संचालक बालाजी बामणे, सुनील घुगे, प्रल्हाद सातव, प्रेमसिंग साबळे, कैलास बिज्जमवार, विद्या दासरवार, कुसुम मुंडे आदींचा समावेश आहे.
दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडवणुकीपूर्वी भाजपमध्ये जोरदार इनकमिक सुरू आहे. त्यामुळे नांदेडमध्ये भाजपची ताकद चांगलीच वाढली आहे.