मोठी बातमी : संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर समस्या, दोन महिने... घेतला 'हा' मोठा निर्णय
मोठी बातमी : संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर समस्या, दोन महिने... घेतला 'हा' मोठा निर्णय
img
वैष्णवी सांगळे
शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जाणारे खासदार संजय राऊत यांना गंभीर आजार झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे. यामुळे संजय राऊत यांनी पुढील दोन महिने सार्वजनिक जीवनापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई महानगरपालिका तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिले असताना संजय राऊत यांनी राजकारणापासून ब्रेक घेत आहे.  ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 



संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. यामध्ये त्यांनी प्रकृतीची गंभीर समस्या उद्भवल्याचे नमूद केले आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की. 



आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीवाद असेच राहू द्या.
इतर बातम्या
Join Whatsapp Group