४ जूननंतर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार - संजय राऊत
४ जूननंतर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार - संजय राऊत
img
Dipali Ghadwaje
अहमदनगर: राज्यात लोकसभा निवडणुकांच्या मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यादरम्यान केले जाणारे हेवेदाव्यामुळे राजकारण तापलंय. निवडणुका संपल्यानंतर राज्यात ४ जूननंतर मोठ्या घडामोडी घडणार, असल्याचं भाकीत संजय राऊत यांनी केलंय. 

निवडणुकानंतर काँग्रेसमध्ये छोटे पक्ष विलीन होतील, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. त्यामुळे संजय राऊत यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झालंय.

सांगली येथील बंडखोर उमेदवारावर काँग्रेसकडून कोणतेही कारवाई झालेली नाहीये. आता फक्त निवडणुका पार पडल्या आहेत. 

चार जूननंतर सांगलीत आणि महाराष्ट्रात बराच घडामोडी घडतील विधानसभा आलेले आहेत, आम्ही पाहू कोण कोणी पडद्याआडून काम केलंय, याचा सर्व रिपोर्ट आमच्याकडे आहेत. शिवसेना यासर्व गोष्टी गांभीर्याने येणार असल्याचे इशारा खासदार संजय राऊत यांनी दिलाय. प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, या शरद पवार यांच्या विधानाचाही संजय राऊत यांनी समाचार घेतलाय. 

आणीबाणीच्या काळात सुद्धा इंदिरा गांधींना बाळासाहेब ठाकरे यांनी जुमानले नाहीत. ना पक्ष विलीन ना विसर्जित केला. कारण आमच्याकडे आत्मविश्वास आहे जनतेचा विश्वास आहे आणि आमचे नेतृत्व खंबीर असल्याचं संजय राऊत म्हणालेत. नाशिकचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांना पोलिसांनी तडीपारचे नोटीस काढलीय. यावरही राऊतांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिलाय. 

तुम्ही नोटिसा काढता आता पुढील काळात राज्याचे मुख्यमंत्री यांचीही जेलमध्ये जाण्याची वेळ होईल. अमित शहा फडणवीस कोणीही वाचवणार नाही कारण त्यांच्यावर अत्यंत यापेक्षाही गंभीर कोणी असून ईडी ही त्यांना सोडणार नाही अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. 

मोदी आता प्रथमच अदानी-अंबानी यांच्यावर बोलायला लागले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले होते की, या देशातला काळा पैसा आणि भ्रष्टाचाराचा पैसा मी नष्ट करेल, असे वचन देतात आणि तेच पंतप्रधान सांगतायेत. अदानी-अंबानी यांचा काळा पैसा टेम्पो भरभरून राहुल गांधी यांच्याकडे जात आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, नरेंद्र मोदी यांना या भ्रष्टाचाराची माहिती आहे.

त्यामुळे मनी लॉन्ड्रिग कायद्याखाली मोदींनी या दोघांना अटक केली पाहिजे. ज्याप्रमाणे इतर लोकांवर कारवाई होते त्याप्रमाणे अदानी-अंबानी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केलीय. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group