उद्या 'सामना'मधून ठाकरे गटाच्या उमेदवारांची घोषणा; संजय राऊतांची माहिती
उद्या 'सामना'मधून ठाकरे गटाच्या उमेदवारांची घोषणा; संजय राऊतांची माहिती
img
Dipali Ghadwaje
एकीकडे महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच उद्या शिवसेना ठाकरे गटाकडून लढवल्या जाणाऱ्या 15-16 जागांवरील उमेदवारांची घोषणा करणार असल्याची मोठी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून ठाकरे गटाच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा होणार आहे. 

महाविकास आघाडीच्या  जागा वाटपासंदर्भात आज शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, जयंत पाटील, ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे, संजय राऊत तसेच काँग्रेसकडून मुख्य नेते उपस्थित राहणार आहेत. 

या बैठकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे. तत्पुर्वी उद्या ठाकरे गटाच्या उमेदवारांची घोषणा होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group