मोठी बातमी : उद्धव ठाकरे घेणार सोमनाथ सूर्यवंशी अन् संतोष देशमुख कुटुंबाची भेट
मोठी बातमी : उद्धव ठाकरे घेणार सोमनाथ सूर्यवंशी अन् संतोष देशमुख कुटुंबाची भेट
img
Dipali Ghadwaje
राज्यभर गाजलेले सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण अन् हत्या प्रकरण आणि मस्साजोगशी संबंधित सर्व गुन्ह्यांचा तपास सीआयडीकडे गेला आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्यामुळे हे प्रकरण राज्यात गाजले. 

यानंतर महाविकास आघाडीसह विरोधकांनी या प्रकरणी महायुती सरकारवर हल्लाबोल केला असून, मनोज जरांगेंपासून ते अंजली दमानिया यांच्यापर्यंत अनेक जण बीडमध्ये भेटी देत आहेत. अशातच आता उद्धव ठाकरे परभणी आणि बीड दौऱ्यावर जाणार असून, सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेट देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , जानेवारीमध्ये पहिल्या आठवड्यात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे परभणी आणि बीड येथे जाऊन सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. तसेच बीडमधील मोर्चा झाला. राष्ट्रीय स्वरूप नाही.

सर्वच पक्षाचे लोक बीडमधील जनता बीडमधील दहशतवाद संपवण्यासाठी किंवा संतोष देशमुखचे खरे आरोपी पकडावे आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून हा मोर्चा आहे. हे सरकार खऱ्या गुन्हेगारांना वाचवत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group